योगी आदित्यनाथ सरकारने ६.५ वर्षात ६ लाख नोकऱ्या दिल्या - सरकारी अहवाल
नवी दिल्ली: शुक्रवारी सरकारी प्रेसरिलीज मध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात मोठ्या रोजगार निर्मितीतून समाजाच्या प्रत्येक घटकाची उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे यात म्हटले आहे.६.५ वर्षात ६ लाख सरकारी नोकऱ्या राज्य सरकारने दिले असल्याचे या जाहीरनाम्यात नमूद केले गेले आहे.
Periodic Labor Force Survey ( PLFS) सर्व्हनुसार २०१७-२०१८ मधील बेरोजगारी दर घटून २०२२-२०२३ मध्ये ३.४ टक्यांपर्यंत खाली आला आहे. उत्तर प्रदेशातील १७-१८ मधील बेरोजगारी दर ६.४ टक्के घटून २०२२-२०२३ मध्ये २.६ टक्के झाला आहे.
माहितीपत्रकात म्हटल्यानुसार, सरकारच्या विशेष प्रयत्नांनी खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.योगी सरकारच्या ' मिशन रोजगार ' या कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी सरकारने प्रयत्न केले.जुलै व ऑगस्ट २०२३ मध्ये १३००० हून अधिक युवकांना सरकारी रूजू पत्र देखील मिळाले असल्याचे सांगितले आहे.