डी मार्ट Q2 निकाल जाहीर. नफा घटला पण उत्पन्न वाढले
इयर ऑन इयर बेसिसवर मात्र १८.५० टक्यांने महसूलात वाढ
मुंबई: देशातील सर्वात मोठ्या रिटेल जायंट पैकी एक अशी ओळख असलेल्या डी मार्ट चे Q2 निकाल जाहीर झाले आहेत. कंपनी अव्हॅन्यू संचलित डी मार्ट ला यंदा आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ६२३.३५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ९.९ टक्यांने निव्वळ नफा घटला आहे.गेल्या वर्षी निव्वळ नफा हा ६८५.७१ कोटी रुपये इतका होता.मागच्या त्रिमासिकात कंपनीचा नफा ५.३६ टक्यांने घटत ६५८.७१ टक्के इतका झाला होता.
कंपनीच्या एक्सचेंज फायलिंगनुसार इयर ऑन इयर बेसिसवर मात्र १८.५० टक्यांने महसूलात वाढ झालेली दिसत आहे. कंपनीच्या २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर बोलताना एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेव्हिल नोरोन्हा म्हणाले, "आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत महसुलात १८.५ टक्के वाढ झाली आहे.उच्च मार्जिन जनरल मर्चेंडाइज आणि कपडे व्यवसायाचे योगदान कमी असल्याने आमचे ग्रॉस मार्जिन मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी आहे.या तिमाहीत आम्ही 9 नवीन स्टोअर्स उघडले आणि आमच्या एकूण स्टोअरची संख्या 336 वर पोहोचली.
कंपनीची देशात एकूण ३३६ रिटेल स्टोअर्स आहेत. जून २३ पर्यंत कंपनीचे वार्षिक उत्पन्न १८.५१ टक्यांने वाढ होत १२३०७.७२ कोटी रुपये इतके झाले आहे.मागील वर्षी हे १०३८४.६६ कोटी रुपये होते.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीची महाराष्ट्र, गुजरात, दमण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, एनसीआर, छत्तीसगड आणि पंजाब मध्ये 13.9 दशलक्ष चौरस फूट रिटेल बिझनेस एरियासह 336 ऑपरेटिंग स्टोअर होते.