आदिलने केला दलित मुलावर बलात्कार; नाव समोर येताच केले विषप्राशन!

    12-Oct-2023
Total Views |
shopkeeper-adil-booking-under-pocso-act-in-moradabad

लखनऊ :
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आदिल रशीद असे आरोपीचे नाव आहे. नामांकन झाल्यानंतर आदिलने विषारी द्रव्य प्राशन केले, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी दि.१० ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.

दरम्यान, याप्रकरणी तक्रारीवरून, पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७७ (अनैसर्गिक बलात्कार), पॉक्सो कायद्याचे कलम तसेच एससी/एसटी कायद्याच्या कलम ३(२)(वा) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्याचवेळी पोलिसांनी पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर उपचार केले. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी मुलाच्या आईने केली आहे. तर याप्रकरणी आदिल काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात जामिनावर बाहेर आला आहे.

सदर घटना बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडित दलित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दि. १० ऑक्टोबर रोजी ९ वर्षीय पीडित मुलगा काही कामासाठी रेशन डीलरच्या दुकानात गेला होता. दरम्यान, पीडित मुलाने वाल्मिकी बस्ती येथील आदिल किराणा दुकान गाठले.

तेथेच आदिलने मुलाला त्याच्या दुकानात बोलावले. आदिलने मुलाला आत बोलावण्यासाठी ५० रुपयांचे आमिष दाखवले होते. मूल आत जाण्यास टाळाटाळ करत असताना आदिलने त्याला आत ओढून नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. आदिलपासून निसटून मुलगा घरी पोहोचताच त्याने संपूर्ण घटना सांगितली.