ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!

    12-Oct-2023
Total Views | 77

dasra

मुंबई :
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईच्या शिवाजीपार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या नक्की कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर या प्रश्नाचा निकाला लागला असून ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाचा मार्ग निवडला असून शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटाने मागे घेतला होता. अशाप्रकारे शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतल्यामुळे ठाकरेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

"यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. कारण शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असणारा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री आहे. सरकार म्हणून आम्ही कोणावर दबाव टाकला नाही. जे लोक आम्हाला सांगतात की, आम्ही दबावाचे राजकारण करतो त्यांनी हे लक्षात घ्यावे की, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करुन आम्हाला परवानगी द्यावी हे सांगायला वेळ लागणार नाही, असा टोला शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी लगावला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121