मुंबई : आयसीसी विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी लखनऊ येथे होत आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३१२ धावांचा डोंगर उभा केला. यात सर्वाधिक धावांचे योगदान डावखुरा फलंदाज, सलामीवीर क्विंटन डिकॉकने १०६ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. तर कप्तान बवुमासोबत पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज मिचेल स्टार्कने २ विकेट्स तर ग्लेन मॅक्सवेलने २ विकेट्स घेतले. तर कप्तान पॅट कमिंसने ९ षटकांत ७१ धावा देत १ विकेट घेतली. आता ऑस्ट्रेलियन संघ ३१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल. यासह विश्वचषकातील पहिला विजय साकारण्याची संधी त्यांना असेल.