पटणा : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५३ वाजता हा अपघात घडला आहे. रघुनाथपूर स्टेशनजवळ दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे २१ डबे रुळावरून घसरल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७० जण दखमी आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. सर्व डबे तपासण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेनही आली असून ती थोड्याच वेळात सुरु होईल," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
केंद्रीय मंत्री आणि बक्सरचे खासदार अश्विनीकुमार चौबे यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. तसेच पूर्व मध्य रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.