मुंबई : इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. या संघर्षाची ठिणगी दिवसागणिक भडकताना दिसत आहे. हमास या युद्धात दररोज असंख्य निष्पापांचा बळी घेताना दिसत असून यातच आता दक्षिण इस्रायलमधील केफर अझातील किबुत्झमध्ये लहान मुलांचे आणि ननजात बालकांचे शिरच्छेद केलेले मृतदेह सापडले आहेत. दरम्यान. हमासच्या इस्लामिक दहशतवाद्यांनी लहान मुलांचा शिरच्छेद केला असल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रवक्त्याने स्पष्टे केले आहे.
तसेच, इस्रायली सैन्य म्हणाले की, हे युद्ध नसून हा एक नरसंहार आहे. तर हे युद्ध नाही, हे रणांगणही नाही. तुम्ही मुलांना, त्यांच्या पालकांना त्यांच्या बेडरूममध्ये, बॉम्बच्या आश्रयस्थानात मारलेले पाहिले. हा नरसंहार आहे. ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नस्लाचे इस्त्रालयाच्या सैनिकाने सांगितले.
दक्षिण इस्रायलमधील केफर अझा या किबुत्झमध्ये लहान मुलांचे आणि अर्भकांचे शिरच्छेद केलेले मृतदेह सापडले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते ताल हेनरिक यांनी याला दुजोरा दिला आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली सुरक्षा दल जेव्हा या भागात पोहोचले तेव्हा त्यांना सुमारे ४० मुलांचे विकृत मृतदेह आढळले.
दरम्यान, हे वृत्त हमासने फेटाळले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, मुलांचे शिरच्छेद झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण आता सीएनएनने नेतन्याहू यांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे. इस्रायलमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या या क्रूर कृत्याची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते ताल हेनरिक यांनी दिली आहे. त्यांनी पुष्टी केली आहे की, इस्त्रायली सुरक्षा दल, जे या भागाचा ताबा घेतल्यानंतर आले होते, त्यांनी या मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्त्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाझावरील हल्ल्यात १००० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.