पॅलेस्टिनचं समर्थन उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? : केशव उपाध्ये

    11-Oct-2023
Total Views |
 
Upadhyay
 
 
मुंबई : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील राजकीय तापमानही वाढताना दिसत आहे. काँग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पॅलेस्टिनचं समर्थन देणाऱ्या काँग्रेसची भुमिका उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
 
 
ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, "काँग्रेसने अल्पसंख्यांकांच्या वोटबँकेसाठी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याच्या ऐवजी पॅलेस्टिनची बाजू घेतली. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? काँग्रेसशी हातमिळवणी केली तरी हिंदुत्व सोडले नाही म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या अल्पसंख्य अनुनयाला साथ द्यायची हा दुटप्पीपणा आहे. उद्धवराव हिंमत असेल तर इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा आणि हमासचा निषेध करा. त्याचबरोबर काँग्रेसचाही निषेध करून दाखवा. आहे हिंमत?" असा सवाल केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.