'इस्त्रो' आगामी मोहिमेसाठी सज्ज; २१ ऑक्टोबरला 'गगनयान' घेणार उड्डाण

    11-Oct-2023
Total Views |
ISTRO Ready For Upcoming Gaganyaan Mission

नवी दिल्ली :
चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ या मह्त्त्वपूर्ण अवकाश मोहिमांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीचे उड्डाण केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने यासंदर्भात ट्विट केले आहे.


दरम्यान, इस्त्रोने चांद्रयान ३ व आदित्य एल १ च्या यशानंतर आणखी एका मोहिमेच्या यशाकडे वाटचाल करण्यास तयार आहे. इस्त्रो गगनयान मोहिमेची पूर्वतयारी करत असून २१ ऑक्टोबरला गगनयान उड्डाण घेण्यास सज्ज असणार आहे. गगनयानास टेस्ट व्हीकल अबॉर्ट मिशन-१ संबोधले जात आहे. ते आऊटर स्पेसपर्यंत पाठवण्यात येईल. त्यानंतर, ते पुन्हा जमिनीवर परतणार आहे.