मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, पश्चिम रेल्वेने खार रोड ते गोरेगाव दरम्यान, ६ व्या रेल्वेमार्गिकेकरिता २९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
दरम्यान, हा मेगाब्लॉक २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान, २,७०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून खार रोड ते गोरेगाव दरम्यान, ६व्या मार्गिकेच्या कामास सुरुवात केली असून जलदगतीने काम पूर्ण करण्यासाठी जवळपास ८.८ किमीपर्यंतचा मार्ग यादरम्यान करण्यात येणार आहे. तसेच, या ६ व्या मार्गिकेचे काम ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे.