राऊतांचा पाय आणखी खोलात; संजय राऊतांविरूद्ध शिवडी कोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट जारी

    07-Jan-2023
Total Views |



राऊतांचा पाय आणखी खोलात; संजय राऊतांविरूद्ध शिवडी कोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट जारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढल आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे.

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र जामीन रद्द झालेला नाही.

‘वॉरंट’ रद्द झाल्याने राऊतांना दिलासा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात वारंवार गैरहजर राहणारे खासदार संजय राऊत शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र ‘वॉरंट’ जारी केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच राऊत हजर झाल्याने त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र ‘वॉरंट’ दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी ‘वॉरंट’ रद्दबातल केले. मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे ’वॉरंट’ बजावले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४ जानेवारीला होणार आहे.
 
१०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. शिवडी महानगरदंडाधिकार्‍यांकडे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरेंट बजावले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.