हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनांना यश! 'पठाण'ला कात्री लागणार!

सेन्सॉर बोर्डानं सुचवले १० कट्स!

    05-Jan-2023
Total Views |
 Pathan


 
 
 
 
मुंबई : शाहरूख खान-दीपिकाच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठान’ चित्रपटात परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) काही बदल सुचविले आहेत. चित्रपट आणि गाण्यात सुचवलेले बदल करून नव्याने चित्रपट परीक्षणासाठी पाठवण्याची सूचना मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी यशराज प्रॉडक्शनला दिले आहेत.
 
 
नायक म्हणून पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शाहरूखच्या चित्रपटाभोवती ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेला वाद आणि बहिष्कार टाकण्याची भाषा यामुळे ‘पठान’ चर्चेत आला आहे. त्यातच आता परीक्षणासाठी परिनिरीक्षण मंडळाकडे बदल करून चित्रपट प्रदर्शनाआधी नव्याने परीक्षण समितीकडे पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
काय आहेत बदल ?
 
‘बेशरम रंग’मधील बोल्ड दृश्यांसह १० शॉट्स बदलण्याच्या सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने दिल्या आहेत. त्यानंतर काही बदल करण्यात आले आहेत, भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल उल्लेख नाही, असं म्हटलं जातंय. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढण्यात आले आहेत. डायलॉगमधून अशोकचक्र शब्द वगळला आहे. यासोबतच गाण्यातील ‘बहुत तंग किया’च्या बोलांसह काही सेन्स्युस व्हिज्युअल्स देखील इतर शॉट्सने बदलले आहेत. ‘बेशरम रंग’मधून दीपिकाची साइड पोजही काढून टाकण्यात आली आहे.