भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    31-Jan-2023
Total Views | 112
modi


नवी दिल्ली : सधाच्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असण्याच्या काळात भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभ प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संसदेच्या आवारात संबोधित केले. ते म्हणाले, सध्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असून ती संकटात आली आहे. अशा जागतिक परिस्थितीत भारताच्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांसह तर संपूर्ण जगाचे लक्ष आहे.


भारताचा अर्थसंकल्प भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जग सध्या भारताकडे अतिशय आशेने पाहत आहे, तो आशेचा किरण अर्थसंकल्पाद्वारे अधिक देदीप्यमान होणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आणि जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत, असा विश्वासदेखील पंतप्रधानांनी व्यक्त केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे ‘इंडिया फर्स्ट सिटिझन फर्स्ट’ असे स्पष्ट धोरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हाच विचार केंद्र सरकारच्या कार्यसंस्कृतीच्या केंद्रस्थानी राहिला आहे. त्याच ध्येयानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा होईल, असा विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांचे नेतेदेखील अभ्यासपूर्ण मुद्दे सभागृहात मांडतील अशी अपेक्षा आहे. देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर सभागृहात चांगले विचारमंथन होईल आणि यातूनच देशासाठी उपयुक्त असे ठरेल ‘अमृत’ प्राप्त होईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121