आलिशान कारमधून गोमांस तस्करी

५०० किलो गोमांस हस्तगत

    30-Jan-2023
Total Views |
Kalyan Police Station


कल्याण :
कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्याण-अहमदनगर महामार्गावर रायते येथे मुंबईकडे जाणार्‍या एका संशयास्पद कारची तपासणी केली असता ५०० किलो गोमांस आढळून आले. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी कारचालक चैतन्य गफाले याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अहमदनगर येथून आलिशान टोयाटो कारने गोमांस नवी मुंबईकडे नेणारी कार कल्याण तालुक्यातील रायते येथे थांबली. तेव्हा, या कारबाबत संशय आल्याने रितिक केदार व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५०० किलो गोमांस आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर कार जप्त करून पोलिसांनी चालकाला अटक केली. दरम्यान, टिटवाळा पोलीस स्टेशनचे ‘पीएसआय’ वाळके याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.