अब बेबी पेंग्विन दूर नहीं है : नितेश राणे

    03-Jan-2023
Total Views |


अब बेबी पेंग्विन दूर नहीं है : नितेश राणे
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या मृत्युवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर भाजप आ. नितेश राणे यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. सुशांतचा मृत्यू हत्या असल्याचा गौप्यस्फोट करणरे रुपकुमार शाह हे या व्हिडीओमध्ये सुशांतचा मृतदेह घेऊन जात असल्याचा उल्लेख करत शेवटी सत्य बाहेर येत आहे, अब बेबी पेंग्विन दूर नहीं है' असा सूचक इशारा नितेश राणेंनी या व्हिडिओतून दिला आहे. व्हिडीओ शेअर करत नितेश राणे म्हणाले की, 'हे स्पष्ट आहे की रूप कुमार शाह हा सुशांतसिंग राजपुतचा मृतदेह घेऊन जाणारा माणूस होता. सुशांतच्या पोस्टमॉर्टमच्या वेळी तो तिथेच होता, हे स्पष्ट आहे. शेवटी सत्य बाहेर येत आहे. अब बेबी पेंग्विन दूर नहीं है. आता न्याय मिळेल!'
अभिनेता सुशांतसिंग राजपूत कथित हत्या प्रकारावरून राज्यात गदारोळ माजलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुशांतसिंगची मॅनेजर दिशा सालियानच्या कथित मृत्यूची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.