शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक

    27-Jan-2023
Total Views |
holiday-for-mumbai-teachers-on-january-30-for-mlc-polls


डोंबिवली
:कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांची मागणी मान्य झाली आहे.



याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी शुक्रवारी शाळांना आदेश काढले आहेत. शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी देण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली होती. याबाबत बोरनारे यांनी १७ जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती या मागणीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना शुक्रवारी आदेश दिले या आदेशान्वये शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे


३० जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असून निवडणूक आयोगाने ठाणे, पालघर, रायगड ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे . मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणारे अनेक शिक्षक ठाणे ,नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने या शिक्षकांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघात नोंदणी केली आहे. मतदार नोंदणी साठी निवासस्थान ग्राह्य धरले जाते. त्यामुळे मुंबईतील अनुदानित ,विना अनुदानित, सेल्फ फायनान्स व अन्य शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी निवासस्थान कोकण मध्ये असल्याने नोंदणी केली असल्याने त्यांना नियमानुसार मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बोरनारे यांनी सुट्टीची मागणी केली असल्याचे सांगितले.