माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी!
दिवंगत सुमंतराव गायकवाड यांनी आयुष्य रिपब्लिकन चळवळीला समर्पित केले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
27-Jan-2023
Total Views | 259
27
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंत राव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला एकनिष्ठपणे समर्पित केले.सत्ता मिळो अथवा न मिळो त्यांनी रिपब्लिकन ही ओळख कायम जोपासली. त्यांनीं कधीही रिपब्लिकन चळवळ सोडली नाही. रिपब्लिकन ऐक्या साठी ते नेहमीच आग्रही होते.माझ्या नेतृत्वाला त्यांनी एकनिष्ठ पणे साथ दिली होती.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे अशी भावपुर्ण श्रद्धांजली रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी आमदार दिवंगत सुमंत राव गायकवाड यांना वाहिली.
ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे काल दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईत के ई एम हॉस्पिटल येथे वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर रात्री नवी मुंबई तुर्भे येथील स्मशानभूमी येथे दिवंगत माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी श्रद्धांजली वाहताना ना.रामदास आठवले बोलत होते. या दुःखद प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील माजी मंत्री अविनाश महातेकर, चंद्रकांत हंडोरे, अर्जुन डांगळे,नानासाहेब इंदीसे, गौतम सोनवणे,राम पंडागळे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंग, सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, तानसेन ननावरे,दिलीप जगताप,पप्पू कागदे,ऍड.गुणरतन सदावर्ते, जयश्री पाटील, सिद्धार्थ कासारे,महेश खरे, सिद्राम ओहोळ, श्रीकांत भालेराव, बाळासाहेब मिरजे; दयाळ बहादूर, असित गांगुर्डे, संगीत आठवले, शशिकला जाधव, चंद्रशेखर कांबळे,सोना कांबळे, मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत सुमंतराव गायकवाड यांची जाहीर श्रद्धांजली सभा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या दि.५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील सेक्टर १५ येथील गुजरात भवनजवळील बुद्ध प्रतिष्ठान हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांनी अनेक वर्षे वरळी येथे वास्तव्य केले.ते माटुंगा लेबर कॅम्प मधून नगरसेवक म्हणून १९६९ मध्ये निवडून आले. ते बेस्ट कमिटी सदस्य राहिले. त्यानंतर सन २००६ साली त्यांना विधान परिषद सदस्य बनविण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर नवी मुंबईत ते राहावयास आले. नवी मुंबई येथे स्मारक उभारून दिवंगत सुमंत राव गायकवाड यांच्या स्मृती जोपासण्यात येतील असे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी अनेक मान्यवरांनी दिवंगत सुमंत राव गायकवाड यांच्या आठवणी सांगत त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.