'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे!
25-Jan-2023
Total Views |
सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता एक वेगळी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' हे या मालिकेचे नाव आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. आता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेतून सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या मालिकेतील कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेत आता २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील मुलांनी भारतीय सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रं तयार केली आहेत. ती शुभेच्छा पत्रं खुप सुंदर आहेत. ही पत्र पोस्टातील कर्मचारी सैन्यदलापर्यंत स्वखर्चानी पोचवणार आहेत. मुलांच्या भावना व देशावरचं प्रेम त्या पत्रांतून व्यक्त झालं आहे. पोस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने ती पत्रं सैन्यदलापर्यंत पोचवली आहेत.