उद्धव ठाकरे
मुंबई : धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 'उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेलं पद हे चूकीचं नाही, मात्र ज्याप्रकारे त्यांनी पक्षप्रमुख नात्याने पक्षाचे जे निर्णय घेतले ते चूकीचे आहे.', असा मोठा युक्तीवाद उपस्थित केला आहे.
"उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेलं पद हे चूकीचं नाही, मात्र ज्याप्रकारे त्यांनी पक्षप्रमुख नात्याने पक्षाचे जे निर्णय घेतले ते चूकीचे आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. त्यात उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशीरपणे बदल केले. जे चूकीचं आहे. राष्ट्रीय कार्यकारणीत एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड झाली होती, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही.", असं जेठमलानी आपल्या युक्तीवादात म्हणाले.
धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. दरम्यान यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करण्यास सुरुवात केला. आज कुणीही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण कुणाचं हे ठरवायला कोणताही अडथळा नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला.
जेठमलानी यांनी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कारण शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं जेठमलामी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.