मेनहोल्स, शौचालये, मलजलवाहिनी या सेवांकडे महापालिकेचे दुर्लक्ष का होते?

    10-Jan-2023   
Total Views |
municipal corporation neglecting the services of manholes, toilets, sewerage


ऑगस्ट २०१७ मध्ये परळच्या भांड्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दु:खद मृत्यू घडल्याचे सर्वांना माहिती आहे. २०१८ मध्ये मालाडला १८ वर्षांच्या मुलाचा पडून मृत्यू व २०२० मध्ये एका व्यक्तिचा घाटकोपरला पडून हाजीअलीला मृतदेह मिळाला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने भांड्यांवर झाकणे व जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला होता.


मुंबई महापालिका नागरिकांना २५हून जास्त सेवा पुरवितात, पण त्यांचे जलभांडी(मेनहोल्स) व मलजलवाहिनींच्या सेवेंकडे व (Manaholes and sewerage lines)त्यांच्या देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रथम आपण जलभांडी(मेनहोल्स) विचारात घेऊ या.मुंबईत पालिकेच्या माहितीप्रमाणे, सुमारे एक लाख जलभांडी(मेनहोल्स) बांधलेली आहेत. ही जलभांडी(मेनहोल्स) मलवाहिन्यांच्या जोड करण्यासाठी व साफ करण्यासाठी बांधावी लागतात. ही जलभांडी(मेनहोल्स) वा व्हॉल्व्ह भांडी पर्जन्य जलवाहिनी, मलजलवाहिनी व शुद्धजलवाहिनी यावर बांधलेली आहेत.पालिकेचा पर्जन्यजलवाहिनी विभाग, मलनिस्सारण विभाग, जल अभियंता खाते अशा विविध खात्यांशी संबंधित मुंबई शहर, उपनगरे व जलविभागांची मुंबईबाहेर तलाव क्षेत्रे इत्यादी ठिकाणी ही जलभांडी व व्हॉल्व्ह भांडी बांधलेली आहेत. जलविभागासाठी मोठ्या जलवाहिन्यासुद्धा रस्त्याच्या बाहेरून वरती टाकलेल्या दिसतात. पहिल्या दोन खात्यांची महापालिकेच्या माहितीप्रमाणे एक लाख जलभांडी(मेनहोल्स) बांधलेली आहेत तर जलविभागांची व्हॉल्व्ह भांडी अंदाजाने ५० हजारांत असतील.

देखाभाल, दुरुस्ती आणि सफाई करण्यासाठी पालिका कर्मचार्‍यांकडून व कंत्राटदारांकडून या भांड्यांची झाकणे उघडली जातात. हल्ली पालिका कर्मचारी वा कंत्राटदार सोडून चोरी करून ही लोखांडी झाकणे उघडली जातात व ती तशीच उघडी राहतात व त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होऊन ती अपघात घडवून आणतात. त्यात कोणीही आत पडून दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. मुंबईत विविध ठिकाणी शंभरहून अधिक ठिकाणी ही भांडी दुरावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. यात काही भांडी उघडी वा तुटलेल्या अवस्थेत राहतात. रस्ते, सिग्नल, पदपथ, दुकानांच्या बाजूला ही भांडी आहेत. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शहरातील चार परिमंडळांमधील पर्जन्यवाहिनी व मलजलवाहिनींची काही व जलविभागाच्या क्षेत्रामध्ये या भांड्यांची झाकणे बसविण्यात आलेली नाहीत, असे आढळून आले आहे. जलविभागाचे झाकणे बसविण्याचे काम वेगळ्या प्रकारे केले जाते व आधीच्या दोन खात्यांतर्फे झाकणे बसविण्याचे काम सुरू आहे. एक लाख भांड्यांच्या झाकणापैकी सुमारे पाच हजार झाकणे व संरक्षक जाळ्या बसवून झाल्या आहेत व उर्वरित काम सुरू आहे. पण या कामात दिरंगाई का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

ऑगस्ट २०१७ मध्ये परळच्या भांड्यात पडून डॉ, दीपक अमरापूरकर यांचा दु:खद मृत्यू घडल्याचे सर्वांना माहिती आहे. २०१८ मध्ये मालाडला १८ वर्षांच्या मुलाचा पडून मृत्यू व २०२० मध्ये एका व्यक्तिचा घाटकोपरला पडून हाजीअलीला मृतदेह मिळाली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने भांड्यांवर झाकणे व जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयाने पालिकेला या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सर्व भांड्यांवर झाकणे व जाळ्या बसविण्याचे काम लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असा आदेश दिला.या भांड्यांवर झाकणे व जाळ्या बसविण्याचा हिशोब खालील प्रमाणे सुरू झाला आहे. मलनिस्सारण विभागाचे काम (एकूण ७४,६८२ भांड्यांपैकी १,७४५ भांड्यांची कामे झाली व पर्जन्यजल विभागात (एकूण २५ हजार भांड्यांच्या कामांपैकी ३,९२० ठिकाणांचे काम पूर्ण झाले आहे.

चलाख (smart) भांडे बसवण्याची नवी कल्पना


भांड्यांवर झाकणे व संरक्षक जाळ्या बसविल्या, तर कोणी पडून भांड्याच्या आत पडणार नाही, पण झाकणे चोरीला जाण्याचे थांबणार नाही, त्याकरिता पालिकेच्या अधिकार्‍यांनी एक शक्कल काढली आहे. पालिका अंकीय पद्धतीच्या मदतीने झाकणांच्या चोरीवर नियंत्रण यावे, अशी प्रणाली बसवणार आहे. कोणी चोर तेथे चोरी करण्यास आला, तर लगेच शिट्टीच्या (siren or alarm) तंत्रज्ञानाच्या आवाजाने ते नियंत्रण कक्षात व त्या सदृश्य ठिकाणी कळू शकेल. या प्रणालीत फक्त कोणीतरी चोरी करीत आहे. एवढेच कळणार नाही तर भांडे पाण्याने वरपर्यंत (overflow) भरले आहे याचीसुद्धा वार्ता शिट्टीमुळे कळेल.

 भांड्यामध्ये सात ते आठ इंच लांबीचे साधन भांड्याच्या दीड फूटखाली बॅटरीसह बसविले जाईल, या बॅटरीचे आयुष्य एक वर्षाचे राहील.मुंबईच्या शहर विभागाकरिता प्रथम १४ ठिकाणी हा प्रयोग करण्याचे ठरत आहे व नियंत्रण कक्षाच्या बाजूला टँकच्या ‘बी वॉर्डा’त ‘जेजे इस्पितळा’च्या जवळ राहील. शिट्टी वाजल्यावर चोर आला आहे हे कळेल व त्याला पालिका पकडू शकेल. हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर सर्व भांड्यांसाठी ही प्रणाली चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविली जाईल.

मलजल सफाई करताना ५ वर्षांत ३०० हून अधिक मृत्यू


मलजल टाक्या (septic tanks) स्वच्छ करण्यासाठी यंत्राचा वापर बंधनकारक असतानाही मागील पाच वर्षांत हे काम करताना देशात ३३० कामगारांना मृत्यू आला आहे. महाराष्ट्रात ही संख्या ३० आहे. विशेष म्हणजे, मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या मदतीतही दिरंगाई होत असून एकूण कामगारांपैकी फक्त २८३ कुटुंबांनाच आर्थिक मदत मिळाली आहे. ही स्वच्छता कामे यांत्रिकरित्या करणे जरुरी आहे. म्हणजे स्वच्छता मजुरांचे प्राण वाचतील.पर्यावरणाची कामे योग्य न केल्याने हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला १२००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’ या घोषणेने कितीही कंठशोष केला, तरी शहरातील अस्वच्छता संपलेली नाही. घनकचरा व सांडपाणी यांच्या विल्हेवाटीची व्यवस्था करावी लागते. त्यांच्या व्यवस्थेसाठी सुयोग्य यंत्रणा उभी करावी लागते. त्यात आपली सरकारे अपयशी ठरत आहेत. पर्यावरण व सार्वजनिक स्वच्छता याबाबत सर्वोच्चन्यायालयाने कान टोचूनही या यंत्रणांना जाग आली नाही. ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने (NGT) महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.घनकचरा व्यवस्थापनासाठी निर्धारित आठ वर्षांची कालमर्यादा व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी गेल्या पाच वर्षांत ठोस परिणाम दिसून न आल्याने लवादाने हा दंड केला आहे. मुंबई महापालिकेनेही अनेक राहिलेली कामे लवकर पूर्ण करावी.

झोपडपट्टीकरिता व सार्वजनिक शौचालये


मुंबईकरांसाठी २० हजार नवीन शौचालये बांधणार अशी माहिती ५०० सुशोभीकरण कामांच्या एक महिन्यापूर्वीच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.या क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या शौचालयांची अवस्था सुधारण्याची गरज आहे, तसेच जुनी व नवीन २० हजार शौचालये योग्य प्रकारे सुविधायुक्त केली जाणार आहेत. झोपडपट्टीतील व सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारण्याची गरज आहे. त्याकरिता २४ तास शौचालयांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठीची यंत्रणा सध्याच्या स्थितीत व वाढत्या गरजानुसार आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. अशी सुविधायुक्त शौचालये आणि ’कम्युनिटी वॉशिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच ’हँगिंग लाईट’च्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. महिलांकरिता २०० प्रसाधनगृहांची निर्मिती सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. त्यात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रसाधनगृहांची योग्य ती नियमित देखभाल व स्वच्छता राखण्यासाठी योग्य ते धोरण करून ते राबविले जाईल.

मलवाहिन्यांच्या सफाईस २० वर्षांनी मुहूर्त


दक्षिण मुंबईच्या काही भागातील मलवाहिन्यांची सफाई गेल्या २० वर्षांत झाली नाही. या मलवाहिन्या ५० ते ६० टक्के गाळाने भरलेल्या आहेत. त्यामुळे मलजलाचा निचरा होण्यास विलंब होत असल्याची कबुली पालिकेनी दिली आहे. अनेकदा मलजल रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना घाणीशी सामना करावा लागत आहे. शेकडो तक्रारी आल्यानंतर प्रशासनानी या मलवाहिन्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहमद अली रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, खेतवाडी रोड, मौलाना शौकत अली रोड्वरील मलवाहिन्यातील गाळ २० वर्षांत साफ केला नाही तो घट्ट झाला आहे. या गाळात प्लास्टिक, कपडे, झाडांच्या फांद्या असल्यामुळे गाळ काढणे सहज शक्य होत नाही.

पालिकेकडे ‘सक्शन’ कम जेटिंग मशीन आहे व ६०० मिमी व्यासापर्यंतच्या मलवाहिन्यांची साफसफाई करण्यात सक्षम आहेत. त्यापेक्षा मोठ्या मलवाहिन्या ’सक्शन कम जेटिंग रिसायकलिंग मशीन’ व जास्त क्षमता असलेल्या ‘सुपरसकर मशीन’ने गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अंदाजे २०२६ किमी लांबीच्या विविध व्यासांच्या वाहिन्या आहेत व ह्यात ९०० मिमींहून अधिक व्यासाच्या १३८ किमी लांबीच्या मलवाहिन्या समाविष्ट आहेत.मुंबई महापालिकेने मलजलाने प्रदूषित झालेल्या समुद्रकिनारी साफसफाई कशी करायची, याकरिता सल्लागाराची नेमणूक केली आहे.मलजल समुद्रामध्ये सोडण्याआधी त्यावर विविध ‘एसटीपी’ केंद्रांकडून प्रक्रिया करणे भाग आहे ते पालिकेचे काम अजून पूर्ण व्हायचे आहे ते त्यानी लवकर हातात घ्यावयास हवे. हरित लवादाचे त्यानी मार्गदर्शन घ्यावे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.