मुंबई दौऱ्यातील या निर्णयामुळे दिसून आलं गृहमंत्री अमित शाह यांचे संवेदनशील नेतृत्व
06-Sep-2022
Total Views |
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दि. ४ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. राजशिष्टाचारानुसार सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करावे लागले असते. परंतु, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून अमित शाह हे मुंबई विमानतळावर वेळेपूर्वीच दाखल झाले. दिवस भरातील उर्वरित बैठका त्यांनी विमानतळावरच घेतल्या.
मुंबईकर सध्या गणेशोत्सवाच्या लगबगीत आहेत, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दिवसभर भक्तांची रीघ लागलेली असते, या मुळे वाहतूक कोंडीसह गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच शाहांचा नियोजित मुंबई दौरा असल्याने वाहतूक यंत्रणा आणि प्रशासनावर येणारा संभाव्य ताण लक्षात घेऊन, अमित शाहांनी हा निर्णय घेतला. महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रथमच राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. सोमवारी सकाळी १०:३० ला त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांनतर वांद्रे येथील काही गणेशोत्सव मंडळांत जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
दुपारी २ नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याच बरोबर महाराष्ट्र प्रदेश भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक घेऊन येत्या काही आठवड्यात होणाऱ्या बीएमसी निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. यासोबतच आघाडी सरकार मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून सूचनाही घेण्यात आल्या. हा संपूर्ण दौरा 'कॉमन मॅन'चा विचार करून जनसामान्यांची गैरसोय होऊ नये याची खात्री करण्यात आली.