शिक्षकांच्या प्रश्नांवर संघर्ष करणारे अनिल बोरनारे

    26-Sep-2022   
Total Views |

anil
 
 
 
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शासन दरबारी आक्रमक होऊन प्रश्न मांडणारे, प्रश्न सोडविणार्‍या अनिल बोरनारे यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाविषयी जाणून घेऊया...
 
 
अनिल बोरनारे यांनी शिक्षक परिषद संघटनमंत्री, उत्तर विभाग अध्यक्ष व आता भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक या पदावर काम केले आहे. त्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांच्याच प्रश्नांवर काम केले आहे. मुंबई विद्यापीठाची एम.ए, एम.एड ही उच्च पदवी त्यांनी प्राप्त केली असून पत्रकारितेत डिप्लोमा केला आहे. कायम विनाअनुदानितमधील ‘कायम’ हा शब्द वगळण्यासाठी त्यांनी आंदोलन केले आहे. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या आंदोलनातदेखील ते सहभाग झाले होते. महिला शिक्षिकांना केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा मिळावी, यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. राज्यातील 94 हजार शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी मिळण्यासाठीचा मार्ग त्यांच्या प्रयत्नांमुळे मोकळा झाला आहे. शासनाकडून प्रशिक्षणाचे आयोजन, राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना 1 तारखेला वेतन देण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले आहे.
 
 
सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ही त्यांनी मिळवून दिली आहे. शासनाला महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्यासाठी त्यांनी भाग पाडले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील शिक्षकांनी प्लानमधील 12 कोटी रूपयांची थकबाकी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी कर्मचार्‍यांसोबत प्रथमच शिक्षक-शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. ठाणे-पालघर जिल्ह्यातील 1200 शिक्षकांना 46 कोटी रूपयांची थकबाकी मंजूर करून घेतली. सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाचे राष्ट्रीय काम करणार्‍या शिक्षकांना मानधनाचे 34 कोटी रुपये मिळवून दिले. सेवेत असताना मृत्यू झालेल्या 685 शिक्षकांच्या कुटुंबीयांना वित्त विभागाकडून मदत मिळवून दिली. मुंबईतील उर्दू माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू केले.
 
 
मुंबई व कोकण विभागातील शिक्षकांचे वेतननिश्चितीचे काम सुरू केले. मुंबईतील 1,142 अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन केले. वेतन निश्चितीमधील भ्रष्टाचार थांबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमिडिएट’ प्रस्तावांना मुदतवाढ मिळवून दिली. शिक्षकांचे मेडिकल बिले, पी.एफवरील कर्ज तातडीने मंजूर करून दिली आहेत. राज्यातील शिक्षकांना ‘रोज लेसन प्लान’ काढण्याची सक्ती मागे घेण्यास भाग पाडले आहे. मतदारयाद्या पुनर्निरीक्षणातून शिक्षकांची सुटका केली आहे. एवढेच नाही, तर शिक्षकांची भरती बंदी उठविली. बोर्डाचे पेपर तपासणार्‍या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले आहे. सिंधी माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांचे हिंदी माध्यमात समायोजन करून घेतले आहे. शिक्षकांना हज यात्रेसह इतर धार्मिक यात्रांसाठी पी.एफमधून रक्कम काढण्यास मंजुरी मिळवून दिली आहे.
 
 
कल्याण-डोंबिवलीमधील 27 गावांमधील शिक्षकांना 30 टक्के घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष महत्त्वाचा ठरला आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शाळांचा दोन वर्षांचा मेहनताना मिळवून देणे, शिक्षकांचे ‘टीईटी’ परीक्षेचे मानधन मिळवून देणे, राज्यातील शिक्षकांना दरमहा ‘सॅलरी स्लिप’ देणे बंधनकारक केले आहे. कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिकांचा प्रश्न मार्गी लावलण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. रात्र ज्युनिअर कॉलेजचे बंद झालेले वेतन सुरू केले आणि निवडणूक अधिकार्‍यांनी ‘रिझर्व्ह’ शिक्षकांचे थांबविलेले मानधन मिळवून दिले.
 
 
इयत्ता दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम तज्ज्ञ मार्गदर्शक आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तज्ज्ञ मार्गदर्शक, मराठी विषय आरएमएसए प्रशिक्षण कार्यशाळा ही त्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा सामायिक विषय, व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जिल्हास्तरीय वेध भविष्याचा कार्यक्रम तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्यावतीने आयोजित सातवी पुनर्रचित अभ्यासक्रम तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.
 
 
शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल बोरनारे यांना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुपये एक लाख, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा गुरूवर्य अ.आ. देसाई वाङ्मयीन पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार, गोदारत्न शैक्षणिक पुरस्कार, तर महात्मा फुले फेलोशिप सन्मान - नवी दिल्ली, स्व. राजीव गांधी पुरस्कार - पुणे गुरूगौरव पुरस्कार 2004 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कर ठाणे, राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार - 2002, मुंबई कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार-मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र गुरूगौरव पुरस्कार 2015, कल्याण व अन्य अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
बोरनारे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीदेखील कार्य केले आहे. विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषणाहार मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे. वाचनसंस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी सहशालेय उपक्रमात अभिवाचन स्पर्धेचा सहभाग करून घेतला. नियमबाह्य परीक्षांपासून विद्यार्थ्यांची सुटका करून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कर्करोगग्रस्त विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत अधिक वेळ मिळावा. याशिवाय मराठी शाळांचे प्रश्न साहित्य संमेलनात मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालभवनचे उपकेंद्र, ठाणे व नवी मुंबईत करावे, यासाठी ही पाठपुरावा केला आहे. पाचवी- आठवी शिष्यवृत्ती रक्कम वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक हेल्पलाईन सुरू करण्याचे काम ही त्यांनी केले आहे, विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘युपीएससी’मध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.