तटरक्षक दलाचा खुलासा; 'ती' बोट संशयास्पद नाही!

    24-Sep-2022
Total Views |

dapoli beach
 
रत्नागिरी: दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट संशयास्पद नाही, असा खुलासा तटरक्षक दलाने केला आहे. विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली आहे.शिवाय नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
 
 
दापोली समु्रकिनारी संशयास्पद बोट सापडल्याची माहिती काल स्थानिक मच्छिमारांकडून प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर तटरक्षक दलाच्या मदतीने याबाबची चौकशी करण्यात आली. यावेळी ही बोट संशयास्पद नसून विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली. शिवाय विजयदुर्ग किनाऱ्यावर पार्थ जहाज बुडाल्यानंतर याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून १९ जणांची सुटका करण्यात आली होती, अशी माहिती देखील तटरक्षक दालकडून देण्यात आली.
 
नेमके काय घडले ?
 
दुबईहून-बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज १६ सप्टेंबर रोजी विजयदुर्ग किनाऱ्याजवळ बुडाले होते. सुदैवाने या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना तटरक्षक दलाने वाचविले होते. हे तेलवाहू जहाज दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जात असताना जहाजाच्या तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून हे जहाज बुडत असताना जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरी येथील तटरक्षक दलाने येवून या जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचविले होते.