सिंगल स्क्रीन सिनेमाची संस्कृती उत्तमरित्या मांडणारा छेल्लो!

"ऑस्कर"च्या स्पर्धेत भाग घेणारा गुजराती चित्रपट "या" दिवशी होणार प्रदर्शित

    21-Sep-2022
Total Views |
THE LAST NIGHT
मुंबई : यंदा छेल्लो शो हा गुजराती चित्रपट ऑस्कर २०२३ साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट श्रेणीसाठी पाठवण्यात आला आहे. पान नलिन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. त्याचे इंग्रजीत नाव लास्ट फिल्म शो असे आहे. पन नलिन, सिद्धार्थ रॉय कपूर, धीर मोमाया आणि मार्क डुले यांनी निर्मित चेलो शो ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर अनेक चित्रपट विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे.
 
 
खरं तर, आरआरआर किंवा 'द काश्मीर फाइल्स' हे चित्रपट ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जातील अशी शक्यता होती. परतू, 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'ने रविवारी 'छेल्लो शो' ची ऑस्कर नामांकानासाठी निवड केल्याचे जाहीर केले. पान नलिन हे अँग्री इंडियन देवी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, फेथ कनेक्शन सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. 'छेल्लोशो हा चित्रपट देखील त्याच पठडीतला आहे.
 
 
चित्रपटांच्या प्रेमात पडलेल्या छोट्याशा खेड्यातील 'समय' नावाचा मुलगा गुजरातमधील छलाला गावात सिनेमा पाहण्यासाठी सिनेमा प्रोजेक्टर तंत्रज्ञांच्या मदतीने प्रोजेक्शन रूममध्ये पोहोचतो आणि तिथे अनेक चित्रपट पाहतो. चित्रपट पाहताना त्याचे आयुष्य कसे बदलून जाते, हे या चित्रपटाचे कथानक आहे. छेल्लोशो मध्ये सिंगल स्क्रीन सिनेमाची संस्कृती उत्तम प्रकारे रेखाटली आहे.
 
 
ऑस्कर २०२३साठी अधिकृत प्रवेश मिळवल्यानंतर, "असा दिवस येईल आणि आनंदाचा उत्सव घेईल, असे मला कधीच वाटले नव्हते. चेलो शो'ला जगभरातून प्रेम मिळाले आहे. पण, माझ्या मनात एक वेदना होती की, मी भारतात ते कसे प्रदर्शित करू. आता मी पुन्हा श्वास घेऊ शकतो आणि मनोरंजन आणि प्रेरणा देणाऱ्या सिनेमावर विश्वास ठेवू शकतो. धन्यवाद एफएफआय धन्यवाद ज्युरी." अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक पान नलिन यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
 
 
तर “आमचा चित्रपट 'लास्ट फिल्म शो' ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडला गेला याचा आम्हाला आनंद आणि सन्मान वाटतो. सिनेमातील जादू आणि चमत्कारांचा अनुभव साजरे करणाऱ्या अशा चित्रपटासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही." अशी प्रत्रीक्रिया चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी नोंदवली.
 
 
सोबतच , जेव्हा महामारीमुळे जगभरातील चित्रपटगृहे बंद होती, तेव्हा अंधाऱ्या सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना पहिल्यांदाच प्रेमात पडल्याची आठवण करून देतो. या चित्रपटाद्वारे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जगभरातील समीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, 'द छेल्लो शो' १४ ऑक्टोबर रोजी भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता ऑस्करला पाठवल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची स्क्रीन वाढवण्याची मागणी करतील, असा विश्वास कपूर यांनी व्यक्त केला.