जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर भारताने सुरु केली इंटरनेट सुविधा!
सियाचीन ग्लेशियरमध्ये इंटरनेट सेवा सुरू
20-Sep-2022
Total Views |
नवी दिल्ली : भारत चीन सीमारेषे जवळील सियाचीन ग्लेशियर हा प्रदेश जगातील सर्वात उंच युद्धभुमी म्हणून ओळखला जातो. अत्यंत उंचीवर असल्याने व प्रचंड थंडीमुळे भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सियाचीन ताब्यात असल्यानेच भारताला चीनच्या कुरापातींवर लक्ष ठेवणे सोपे जाते. म्हणूनच युद्धाच्या दृष्टीने हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने एक पाऊल पुढे टाकत सियाचीन ग्लेशियरवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरु केली.
१९६२ च्या भारत चीन युद्धात केवळ देशाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या कचखाऊ भुमिकेमुळे देशाला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने भारतीय लष्कराच्या आधुनिकतेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यामुळे देशी बनावटीची शास्त्रात्र निर्मितीवर भर देण्यात येतोय तर दुसरीकडे सैन्याला आधुनिक शस्त्र मिळवीत यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले जात आहेत. सियाचीन सारख्या अत्यंत दुर्गम भागात इंटरनेट सुविधा सुरु करून संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी भारतीय सैन्याने पुन्हा एकदा करून दाखवली आहे.
सियाचीनचे लष्करीदृष्ट्या असलेले महत्व लक्षात घेऊन इंटरनेटद्वारा माहितीची देवाण घेवाण जलद व्हावी या उद्देशाने सियाचिन ग्लेशियरवर उपग्रह आधारीत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या फायर अॅंड फ्युरी कॉर्प्सने ट्विट करत, ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, सियाचीन ग्लेशियरमध्ये १९,०६१ फूट उंचीवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सक्रिय करण्याचं काम पूर्ण झालं आहे. सामरिक दृष्टीकोनातून भारतासाठी हे मोठं यश आहे. यामुळे भारतीय सैन्याला टेहाळणी आणि कम्युनिकेशनसाठी मोठी मदत होणार आहे.
सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी असल्याचं मानलं जातं. इथे वर्षभर सरासरी तापमान उणे २० अंशांपेक्षा कमी असतं. आणि हिवाळ्यात इथलं तापमान ५० अंशांपर्यंत खाली जातं. त्यामुळे इथे माहितीची देवाणघेणाण करताना अनेक अडणींना सामोरं जावं लागत होतं. १८ सप्टेंबर २०२२ पासून इथं इंटरनेट सेवा सुरु करून भारतीय लष्कराने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.