आपचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री दारूच्या नशेत धुंद,उतरवले विमानातून खाली!

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिंदर सिंह बदल यांचा दावा

    20-Sep-2022
Total Views |

BHAGAVANT MAAN

 
 
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे नेते मनीष सिसोदिया अडचणीत सापडलेले असताना, आप नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दारूच्या नसेत धुंद असल्याने विमानातून खाली उतरवण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. मान यांनी अती मद्यपान केले असल्याने त्यांना धड चालताही येत नव्हते त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले असा दावा अकाली दलाचे नेते सुखबिंदर सिंह बदल यांनी केला आहे. या घटनेने जगभरातील पंजाबीची मान शरमेने खाली गेली, असेही बादल यांनी ट्वीटरद्वारे म्हंटले आहे.
 
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवले. मान यांनी जास्त दारु प्यायल्यानं एअरलाइन्सने त्यांना खाली उतरवले. भगवंत मान जर्मनीला गेले होते. तिथून परत येताना हाप्रकार घडल्याचे बादल यांनी सांगितले. तसेच मान यांच्यामुळे विमानाला तब्बल चार तास उशीर झाल्याचे बादल यांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
 
भगवंत मान मद्याधुंद अवस्थेत असल्याने त्यांना विमानातून खाली उतरवले, असे रिपोर्ट्स येत आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला आहे. तसेच ते पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही गैरहजर राहिले होते. या घटनेने जगभरातील पंजाबींना लाज वाटत असल्याचं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे.
 
 
परंतु भगवंत मान यांच्यावर करण्यात आलेले आरोप आपने फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी १८ सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती. त्यानुसार १९ सप्टेंबरला ते दिल्लीला परतले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप निराधार असून ते खोटा प्रचार करत असल्याचे आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी म्हटलं आहे.