मी मातोश्री,सेनाभवनाला भिक घालत नाही! : आ.शहाजीबापूंचा ठाकरेंवर प्रतिवार

    02-Sep-2022
Total Views |
shahajibapu 
 
 
मुंबई : काय झाडी,काय डोंगर या डायलॉगने महाराष्ट्राच्या घरा घरात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे कार्यसम्राट आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी “संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद” अशी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली. त्याला प्रतीउत्तर देताना " माझ्यावर टीका करायला आणि बदनाम करायला मातोश्री, सेना भवन आणि मुंबई येथून आदेश निघत असले, तरी मी या कोणालाच भीक घालत नाही", अशी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत शहाजीबापूंनी शिवसेनेला टोला मारला.
 
 
त्यावेळी ५० खोके एकदम ओके या विरोधकांनी उठवलेल्या खोट्या आरोपांना उत्तर देताना "कसले 50 खोके, साधी पेटीही पाहायला मिळत नाही. आता विरोधकांना थेट मैदानात उत्तरे देऊ", असा थेट इशारा शहाजीबापूंनी विरोधकांना दिला. युवासेनेने गुरुवार दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी "संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद" अशा घोषणा देत, माळशिरस तालुक्यातील संगम इथे रास्ता रोको आंदोलन केलं होत.
 
 
शहाजीबापूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांगोल्यात भाड्याचे बंगले देतो, असं विधान केल्याचा आरोप करून ठाकरे गटाच्या युवसेनेच्या कार्याकार्त्याकडून शहाजीबापूंवर विखारी टीका केली गेली. त्याचा खरपूस समाचार घेताना "हातातील सत्ता गेल्याने शिवसेना आक्रमक होणे अपेक्षित होते. यातच आमदार बाहेर पडल्यावर राज्यात दंगली करायच्या, आमदारांच्या घरावर दगडे फेकायचा त्यांचा डाव होता. मात्र राज्यात असे काहीच न झाल्याने शिवसेना बिथरली आहे , असा हल्लाबोल शहाजीबापूंनी केला.
 
 
सांगोला हा अतिशय परिपक्व लोकांचा मतदारसंघ आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी इथे शिवसेनेला हजारापेक्षा जास्त मते मिळणार नाहीत, असा दावा शहाजीबापूंनी माध्यमांशी संवाद साधताना केला.