"७० वर्षांत जे झाले नाही, ते मोदी यांनी करून दाखवले"
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुरांचा विरोधकांवर घणाघात
18-Sep-2022
Total Views |
मुंबई : देशात आजवर एकाच पक्षाचे राज्य होते, एवढी वर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा देशात विकास झालाच नाही, गरिबांपर्यंत काहीच पोहोचले नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलून दाखवले. "गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही ते मोदींनी अवघ्या काही वर्षांत करून दाखवले" असे कौतुकोद्गार काढत केंद्रीय युवककल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदींच्या काळात राबवल्या गेलेल्या कल्याणकारी योजनांनी देशातील गोर-गरिबांना फायदाच झाला आहे असाही दावा त्यांनी केला. अनुराग ठाकूर सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
मोदी सरकारच्या काळात खूप विकास झाला आहे, याचे उदाहरण देताना अनुराग यांनी स्वतःच्याच गावाचे उदाहरण दिले. लहानपणी त्यांच्या गावात अगदी अंघोळीसाठीही दूरवरून पाणी आणावे लागे, शिक्षणाच्या सुविधाही फारशा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे लहानपणी खूप त्रास सहन करावा लागला. मोठे झाल्यावर कार्यकर्ता म्हणून जेव्हा देशभर फिरायचो तेव्हा, लोकांकडे असेलली शौचालयांची अनुपलब्धता, स्वच्छतेची नसलेली जाणीव, हेच चित्र दिसायचे. स्त्रियांचे हाल खूपच वाईट होते. पण मोदी यांनी आल्या आल्या या मूलभूत गोष्टींकडे लक्ष पुरवले आणि आता आपल्याला दिसतंय की लोकांना किती फायदा झाला आहे. असे दावे अनुराग यांनी केले आहेत.
अनुराग ठाकूर सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या मिशन ४५ च्या अंतर्गत केंद्रीय मंत्र्यांना ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार नाही तिथे दौरे करून भाजपचे संघटन मजबूत करण्यास सांगितले आहे. अनुराग ठाकूर यांनी रविवारी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात दौरा करत आहेत. यामध्ये त्यांनी बीडीडी चाळींना भेट देऊन तेथील पोलीस वसाहतीतील पोलसांशी संवाद साधला.