मुंबई (प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील फिल्मसिटी परिसरात रविवारी सकाळी ९ महिन्यांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ठाणे वन विभागाने हा मृतदेह ताब्यात घेतला असूनपुढील तपासणी साठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव केंद्रात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर अंतर्गत रक्तस्त्राव आणि श्वासोच्छवासाच्या समस्येशिवाय 'डोक्याला आघात' झाल्याचे आढळले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या बिबट्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण तपासले जाणार आहे.A बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. दरम्यान, रविवारी सकाळी सेटवरील कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. फोन करताच आरे पोलिस आणि नॅशनल पार्कचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याचे शव राष्ट्रीय उद्यान वन्यजीव रुग्णालयात नेले. यानंतर मृत बिबट्याचे पोस्टमार्टम केले जाईल आणि त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.