मुंबई: दापोलीत अनाधिकृत साई रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी वादात असलेले माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. याआधी भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहार या रिसार्टमध्ये केल्याचा आरोप केला होता. अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. हे रिसॉर्ट गणेश उत्सवानंतर लवकरच जमीनदोस्त होईल असा देखील इशारा सोमय्या यांनी दिला होता.
माध्यमांशी बोलताना राणांनी शिवसेना तसेच संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाना साधला आहे. "संजय राऊत हे पोपटासारखे बोलायचे, मात्र आता जेलची हवा खात आहेत, त्यामुळं पोपटासारखे बोलणारे राऊत तुंरुगात गेले आहेत, तर परब हे सुद्धा तुंरुगात जातील, परबांवर अटकेची टांगती तलवार आहे. अनिल परबांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते." असा गौप्यस्फोट राणांनी केला आहे.
रिसाॅर्ट जमीदोस्त होण्याची कारवाई सुरु:
पर्यावरण विभागाकडून बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या २२ सप्टेंबर पर्यंत रिसाॅर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांनी अर्ज करण्याचा आवाहन या निवेदेन द्वारे करण्यात आलं आहे. तसेच या ठिकाणी मनीलॉन्ड्रीग केल्याचा ठपका परब यांच्यावर आहे. आर्थिक गैरव्यवहार या रिसार्टमध्ये केल्याचा आरोप याआधी किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुद्धा करण्यात आली आहे.