नवी दिल्ली : "मी नरेंद्र मोदींना आव्हान देतो की त्यांनी आता माझ्या घराचे स्टिंग ऑपरेशन करावे. जर सोमवारपर्यंत काही सापडले नाही तर, नरेंद्र मोदींनी माझं माफी मागावी" अशा शब्दांत दिल्लीचे घोटाळेबाज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहे. माझ्या घरावर आता पर्यंत सीबीआयची धाड पडली,ईडीची धड पडली पण काहीच मिळाले ना, लॉकर्स मध्ये काही मिळाले, कारण काहीच बेकायदेशीर नव्हते. त्यामुळे आता तर त्यांनी माझ्या घराचे स्टिंग ऑपरेशन करावे, असे आव्हान मनीष यांनी दिले आहे.
दिल्लीच्या उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया हे सीबीआय कडून प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. हे संपूर्ण प्रकरण दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरण-२०२१ शी संबंधित आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे या विभागाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत दिल्ली सरकारने मद्यपानाचे वय २५ वर्षांवरून २१ वर्षे केले होते. यासोबतच हॉटेल्सचे बार, क्लब आणि रेस्टॉरंट्स पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष यांनी दिलेल्या आव्हानासाठी त्यांची पाठराखण केली आहे, चेक सच्चा, बहाद्दर कार्यकर्ताच असे धाडस दाखवू शकतो असे कौतुक केले आहे. आपण मनीष यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या कार्यामुळे भाजप घाबरला आहे त्यामळे ते असले धंदे करतो आहे, तुम्ही तुमचे काम करत राहा अशा शब्दांत अरविंद केजरीवालानी सिसोदियांचे कौतूक केले आहे.