वेदांता - फॉक्सकॉन महाराष्ट्रात लवकरच मोठा प्रकल्प सुरु करणार!

वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्याकडून घोषणा

    15-Sep-2022
Total Views |

fadanvis
 
 
मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याबद्दल जोरदार राजकीय घमासान सुरु आहे. अशातच वेदांता - फॉक्सकॉन समूहाचे अध्यक्ष नितीन अग्रवाल यांच्याकडून लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबरीने आपला प्रकल्प गुजरातला का हलवला गेला याची कारणेही त्यांनी आपल्या ट्विटमधून त्यांनी जाहीर केली आहेत. आपला प्रकल्प हा भारताच्या इलेकट्रीक उद्योगासाठी खूप मोठे योगदान देणारा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
 
आपल्या या प्रकल्पासाठी वेदांता समूह गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. आम्ही या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक. गुजरात या सर्वच राज्यांत जागेसाठी चाचपणी करत होतो. महाराष्ट्रात प्रकल्प सुरु करण्यासाठी आम्ही आग्रही होतो पण गुजरातसोबत आमच्या कंपनीने प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यातच आमच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून बोलावणे आले आणि त्यांनी आमच्यासमोर निदान या प्रकल्पाचे संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी विनंती करण्यात आली. भारताच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि गुजरातच्या प्रकल्पाचे सर्व संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करणार आहोत. लवकरच त्याबद्दल आम्ही घोषणा करतो.
 
 
 
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वेदांता समूहाचे आभार
वेदांता समूहाने त्यांचे संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयाचे खरे शिल्पकार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. वेदांता समूहाने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी वेदांता समूहाचे आभार मानले आहेत. आम्ही वेदांता समूहाचे स्वागत करतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राची उद्यमशीलता जपण्यासाठी आम्ही कायमच कटीबद्ध राहू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.