मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा...मनसेचा पोलिसांना पुन्हा अल्टिमेटम!
15-Sep-2022
Total Views | 140
73
नाशिक: राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव काळात मशिदींवरील भोंग्याचा आवाज वाढवण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं. त्यानंतर भोंग्याचा आवाज कमी झाला होता. मात्र, श्रावण मास आणि गणेशोत्सवात या भोंग्याचा आवाज पुन्हा वाढला आहे. त्यामुळे समाजातील काही घटक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मनसेनं केला आहे.
"न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि हे भोंगे सात दिवसांच्या आत काढून टाकावेत. अन्यथा मशिंदीसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल आणि भोंग्यांच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल," असे नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले.