मध्य रेल्वेकडून महत्त्वाच्या स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग सुविधा उभारल्या!

    15-Sep-2022
Total Views |

ev
 
 
मुंबई: हरित उपक्रमांचा पाठपुरावा करणाऱ्या मध्य रेल्वेने महत्त्वाच्या स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावत मध्य रेल्वेने मुंबई विभागातील महत्त्वाच्या ९ स्थानकांवर EV (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत.
 
 
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल या ९ स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा पर्यावरणीय स्थिरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ई-मोबिलिटीला चालना देतील कारण ते कार्बन उत्सर्जन कमी करते तसेच कमी देखभालीची आवश्यकता पूर्ण करण्याव्यतिरिक्त लोकांच्या जीवन पद्धतीची गुणवत्ता सुधारते.
  
रेल्वे स्थानकांवर ही सार्वजनिक चार्जिंग सुविधा 24x7 कार्यरत आहे. EV (इलेक्ट्रिक वाहन)चे परीचालन सुरळीतपणे होण्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधा देखील वाढवेल, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, कारण ते रेल्वे स्थानकांजवळील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे ईव्ही चार्ज करू शकतील. या ईव्ही चार्जिंग सुविधेच्या तरतुदीने भाडे-व्यतिरिक्त महसूल योजनेद्वारे मध्य रेल्वेला हरित उपक्रमांना चालना देण्याव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते.
 
 
मुंबईतील रस्त्यावर मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांसाठी, रेल्वे स्थानकांवरील ही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा परवडणारी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह चार्जिंग पॉईंट प्रदान करेल आणि त्यामुळे अधिक इलेक्ट्रिक वाहनांना रस्त्यावर येण्यास प्रोत्साहन मिळेल आणि निरोगी हवा आणि स्वच्छ वातावरणास प्रोत्साहन देण्यास मदत होईल.
 
 
येत्या काही वर्षांत 100% विद्युतीकरण, उर्जेचा वापर कमी करणे, सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेच्या निर्मितीद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणे यासारख्या भारतीय रेल्वेने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या पुढाकारांमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट्सच्या तरतुदी हे आणखी एक ‘हरित उपक्रम’ पाऊल आहे.