...म्हणून 'ते' पाच ते सहा जण बोलले नाहीत; सुप्रिया सुळेंनी दिले स्पष्टीकरण!

    13-Sep-2022
Total Views |
 
ss
 
 
मुंबई: दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिक लक्ष्यवेधी ठरलेली बाब म्हणजे अजित पवार यांचे नाराजीनाट्य. अधिवेशन सुरु असताना अजित पवार अचानक उठून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पण यावर स्वत: अजित पवार यांनीसुद्धा खुलासा केला. "दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पण मी अधिवेशनातून उठून गेलो म्हणून माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. राष्ट्रीय अधिवेशन असल्याने मी बोललो नाही. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून ते आधी बोलले." असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
 
यावर सुप्रिया सुळे यांनी आज फुरसुंगी या ठिकाणी आल्या होत्या, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "परवा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सर्वच जण भाषणे करणार हाेते, परंतु भाषणे लांबली. मीसुद्धा माझ्या ७ मिनिटांपेक्षा अधिक बाेलले. त्यामुळे कार्यक्रमास उशीर झाला हाेता. काही लाेकांची विमाने, रेल्वेची वेळ झालेली हाेती. त्यामुळे अजित पवार, सुनील तटकरे, वंदना चव्हाण असे पाच ते सहा जण बाेलले नाहीत. जयंत पाटील यांनीही थाेडक्यात भाषण आटाेपले. त्यानंतर थेट साहेबांना भाषण करू दे, म्हणजे वेळेत कार्यक्रम संपेल, अशी चर्चा झाली. मात्र, इतके काही बातमी हाेण्याइतपत इंटरेस्टिंग घडलेले नाही." असे स्पष्टीकरण सुळेंनी दिले.
 
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "अजित पवार नाराज नाहीत. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गेले होते. आणि काही मिनिटातच ते परतले." असे मिटकरी यांनी सांगितले.