पवई 'सायकल ट्रॅक' प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेला बजावली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस

    13-Sep-2022
Total Views | 65
 
 
मुंबई(प्रतिनिधी): पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकरणी काम थांबवण्याखेरीज कोणती ही कारवाई करण्यात आलेली नाही. याप्रकरणी प्रार्थमिक याचिकाकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली आहे. दि. ६ मे रोजी पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कोणतेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते. केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. तसे न करता, मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
 
 
पालिकेने तलावाच्या परिघात सुमारे ५०मीटरहुन अधिक पर्यंतचा खडी दगडांचा भराव घातला होता. तो आजतागायत तसाच आहे. पवई तलाव हा केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या 'नॅशनल वेटलँड ॲटलास'वर 'पाणथळ' क्षेत्र म्हणून अधिसूचित आहे. महानगरपालिकेने तलावच्या संपूर्ण परिघावर सायकल आणि ‘जॉगिंग ट्रॅक’ बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता, आणि त्या दृष्टीने काम सुद्धा सुरू केले होते. मात्र, या विरोधात आयआयटीच्या पर्यावरण अभ्यासक ओमकार सुपेकर आणि डॉ. अभिषेक त्रिपाठी यांनी १४ ऑक्टोबर, २०२१ जनहित याचिका दाखल केली होती. 
 
 
या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला पूर्ण स्थगिती दिली होती आणि केलेले बांधकाम तत्काळ हटवून पूर्ण क्षेत्र पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. मंगळवारी दि. १९ सप्टेंबर रोजी ओंकार सुपेकर आणि अभिषेक त्रिपाठी यांनी वकील राजमणी वर्मा यांचा मार्फत ही नोटीस महानगरपालिकेला बजावली आहे. महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयातील याचिके मागे घेतली असली तरी उच्च न्यायालयाचे आदेश पालिकेसाठी बंधनकारक आहेत. महापालिकेने या वर त्वरित कारवाई न केल्यास उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दावा याचिका दाखल करण्यात येईल असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.   
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121