६०० कोटींचा ब्रम्हास्त्र म्हणजे 'डिझास्टर'

कंगना रणौतचा करण जोहरवर पुन्हा निशाणा

    10-Sep-2022
Total Views |
 




मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ब्रम्हास्त्र' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. काही आठवड्यांपासून बॉलिवूड चित्रपट सृष्टी आणि हिंदी सिनेमांच्या विरोधात सुरु असलेल्या 'बायकॉट' अभियानाचा अक्षयकुमारसह काही बड्या अभिनेत्यांना तगादा झटका बसला होता. या पार्श्वभूमीवर रणबीर आणि आलियाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर अभिनेत्री कंगना रणौतने निशाणा साधला आहे. ६०० कोटींचा खर्च करून बनविण्यात आलेला 'ब्रम्हास्त्र' सिनेमा म्हणजे डिझास्टर आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.
समाजमाध्यमांवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये कंगनाने 'ब्रम्हास्त्र'सह निर्माता - दिग्दर्शक करण जोहरवरही निशाणा साधला आहे. कंगनाने म्हटले की, 'करण जोहरसारख्या लोकांची त्यांच्या वागणुकीबद्दल चौकशी झाली पाहिजे. यावेळी करणने हिंदू धर्म आणि दक्षिणेची लाट यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला आहे.' 
सिनेमातील दाक्षिणात्य कलाकारांच्या सहभागावरही कंगनाने निशाणा साधला आहे. 'करणने त्याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाक्षिणात्य कलाकार आणि दिग्दर्शक भीक मागितली. साउथ स्टार नागार्जुन देखील ब्रह्मास्त्रचा एक भाग आहे आणि अलीकडे ज्युनियर एनटीआर आणि एसएस राजामौली यांनी हैदराबादमध्ये चित्रपटाची जाहिरात केली. दाक्षिणात्य सर्व काही करतील पण सक्षम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि इतर कलागुणांना भाड्याने घेणार नाहीत.'


६०० कोटींची जळून राख
'ब्रम्हास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जीवरही कंगनाने टीका केली आहे. 'अयान मुखर्जीला प्रतिभावान म्हणणाऱ्या प्रत्येकाला ताबडतोब तुरुंगात टाकले पाहिजे… हा चित्रपट बनवायला त्याला 12 वर्षे लागली, त्याने या चित्रपटासाठी 400 दिवसांपेक्षा जास्त काळ शूट केलेले 14 डीओपी बदलले. हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपये जळून राख झाले,' असेही तिने म्हटले आहे.