कोण आमिर खान? मला नाही माहित

अन्नू कपूर यांचे आश्चर्यकारक विधान !

    08-Aug-2022
Total Views |

annukapoor
 
मुंबई : बॉलिवूडचे कलाकार नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सध्या अभिनेता अन्नू कपूरदेखील आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अन्नू कपूर यांच्या वक्तव्यामुळे सगळेच चकित झाले आहेत. अन्नू कपूर यांनी आमिर खानबाबत असं काही म्हटलं आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
 
 
अन्नू कपूर आता फक्त चित्रपटातच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा अभिनय करत आहेत. नुकतीच त्यांची 'क्रॅश कोर्स' ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान अन्नू कपूरला एका पत्रकाराने आमिर खानच्या आगामी 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटाबाबत एक प्रश्न विचारला होता. यावेळी अन्नू कपूर यांनी जे उत्तर दिले की सर्वानांच धक्का बसला आहे.
 
 
 
 
प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अन्नू कपूर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तेथे मीडिया मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सोबतच अन्नू कपूर यांना विविध प्रश्न विचारण्यात येत होते. दरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारत म्हटलं, 'आमिर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' रिलीज होणार आहे. त्याला मध्येच थांबवत अन्नू कपूर म्हणाले 'ते काय आहे'? , मी चित्रपट पाहात नाही.
 
 
 
 
त्यांनतर त्यांच्या मॅनेजरनेसुद्धा मध्ये हस्तक्षेप करत 'नो कमेंट्स' असे म्हटले आहे. अन्नू कपूर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे म्हटले आहे, 'मी चित्रपट पाहात नाही. ना ओळखीच्या व्यक्तींचा ना अनोळखी व्यक्तींचा. आणि तो कोण आहे मला माहिती नाही'. त्यामुळे मी याबाबत काय बोलणार.' अन्नू कपूर यांच्या अशा उत्तराने सर्वानांच चकित केलं आहे.