गणपती साठी यंदाही 'मोदी एक्सप्रेस' कोकणवासीयांच्या सेवेत

नितेश राणेंचा अभिनव उपक्रम

    07-Aug-2022
Total Views |
 
nitesh
 
 
मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही एक खुशखबर आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही प्रवाशांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या बद्दल ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत ही खुशखबर दिली. यावर्षी गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी म्हणजे २९ ऑगस्टला ही मोदी एक्सप्रेस दादरवरून कणकवलीला जाण्यासाठी सुटेल. सकाळी १० वाजता प्लॅटफॉर्म नं. ८ वाजता ही एक्सप्रेस सुटेल. गेल्या दहा वर्षांपासून नितेश राणे आपल्या परीने गणेशभक्तांची कोकणात जाण्याची सोय करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून मोदी एक्सप्रेस त्यांच्याच प्रयत्नांनी सुरु झाली आहे.
 
 
 
 
 
या गाडीचे तिकीट मिळवण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. ज्यांना या गाडीने जायचे असेल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या कुठल्याही तालुका अध्यक्षांना फोन करून या गाडीचे तिकीट मिळवायचे आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रवाशांना गाडीतच जेवण सुद्धा दिले जाणार आहे. त्यासोबतच गणपती उत्सव दणक्यात साजरा व्हावा यासाठी आरत्यांचे पुस्तकसुद्धा बरोबर दिले जाणार आहे. गणपती उत्सव आणि कोकणी माणसाची एक भावनिक नाळ जोडलेली असते याच भावनेने नितेश राणे यांनी हा उपक्रम प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केला आहे.