उमेश कोल्हेंचा गळा चिरुन मौलवीनं केली होती बिर्याणी पार्टी!
06-Aug-2022
Total Views |
नवी दिल्ली: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्मांचं समर्थन करणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी लिहिल्याने त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय संथ गतीने सुरु होता. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तेवर येताच या प्रकरणाच्या तपासाने चांगलाच वेग घेतला.
उमेश कोल्हे हत्याप्रकरणातला आरोपी मौलवी आणि अरबाज यांनी कोल्हेंच्या हत्येनंतर बिर्याणीची मेजवानी झोदापली असा मोठा खुलासा एनआयएने कोर्टात केला आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणात एनआयए ने मुशफिक अहमद आणि अब्दुल अरबाज नावाच्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुशफिक अहमद हा मौलवी आहे आणि अब्दुल अरबाज रेहबर हा एका एनजीओमध्ये रुग्णवाहिकेचा चालक आहे.
एनआयएने दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, या आरोपींनी या हत्येचा सूत्रधार इरफान खान आणि इतर आरोपींना हत्येनंतर लपण्यासाठी मदत केल्याचे न्यायालयाला सांगितले. याशिवाय उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर या आरोपींनी डिनर पार्टीचे आयोजन केल्याचे एनआयएने सांगितले. या पार्टीसाठी आणखी लोकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. आता या डिनर पार्टीत आणखी कोण-कोण सामील होते, याचा शोध घ्यावा लागणार आहे. दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आणखी दोघांना अटक केली. दोघांना अटक केल्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मौलवी मुशफिक अहमद (४१) आणि अब्दुल अरबाज (२३) यांनी हत्येसाठी पैसे उभे केले आणि इतर आरोपींना आश्रय दिला असा संशय आहे.