सकाळच्या भोंग्यामुळे चाळीस आमदार शिंदेगटात!

    05-Aug-2022
Total Views |

raut
 
मुंबई: "शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रीपद मिळालं. पण आता राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठीच त्यांच्याविरोधात ईडीचं कटकारस्थान सुरु आहे." असा आरोप सुनिल राऊत यांनी केला. शिंदे गटावर टीकास्त्र सोडतं सुनिल राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
 
शिवसेनेविरोधात सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. "जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय ६१ आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करतंय. हे सूडाचं राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे. मात्र या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना उध्दव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार..आम्ही झुकणार नाहीत." असेही सुनील राऊत म्हणाले.