नवी दिल्ली: भारताच्या सुधीरने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच १३४.५ गुणांसह राष्ट्रकुल खेळात विक्रमही नोंदवला आहे. सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि नंतर २१२ किलो वजन उचलून आघाडीवर गेला. या आधी जून महिन्यात झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुधीरने कांस्यपदक पटकावले होते
सुधीरला पोलिओच्या प्रभावामुळे दिव्यांग्त्व आहे. त्याने या वर्षी होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्यल्या पॅरा खेळात भारताचे सुर्वण पदक मिळवून दिले आहे. या खेळात इकेचुकवू ख्रिश्चन ओबिचुकवूने १३३.६ गुणांसह रौप्य पटकावले, तर मिकी युलने १३०.९ गुणांसह कांस्यपदक पटकावले. यावर्षी जूनमध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग आशिया-ओशनिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुधीरने पुरुषांच्या ८८ किलोपर्यंत सर्वोत्कृष्ट २१४ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले होते. सुधीर यांनी पॉवरलिफ्टिंगची सुरुवात २०१३ साली केली होती. या पदकामुळे सुधीरला हँगझोऊ २०२२ आशियाई पॅरा गेम्ससाठी देखील पात्रता मिळवली आहे. सुधीर हा सात वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे. तसेच सुधीरने दोनदा स्ट्रॉंगमॅन ऑफ इंडियाचा किताबही पटकावला आहे.
भारताचा स्ट्रॉंगमॅन सुधीर
हरियाणाच्या सोनीपत येथील लथ गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला सुधीर लहानपणापासूनच हुशार होते. वयाच्या पाचव्या वर्षी पायाच्या त्रासामुळे ते अपंग झाले. सुधीर यांना पोलिओ झाला. असे असूनही त्यांनी हार मानली नाही. २०१३ मध्ये त्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पॉवरलिफ्टिंग सुरू केली. त्यात सततच्या सरावामुळे त्यांनी हा खेळ जीवनाचा भाग बनवला.