जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक: १ लष्करी जवान आणि १ नागरिक जखमी

    05-Aug-2022
Total Views | 70
Encounter
 
 
 
 
 
 
 
श्रीनगर: काश्मीरच्या कुलगाममधील रेडवानी भागात शुक्रवारी दि. ५ ऑगस्ट रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यावर सैन्य दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. सुरक्षा दलांकडून परिसरात अजूनही शोध सुरू आहे.
"चकमकीत एक लष्करी जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. परिसरात शोध अजूनही सुरू आहे. पुढील माहिती पुढे येईल," अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये दिली.  दहशतवादी लपले आहेत अशी बातमी मिळताच जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाने त्या जागेला घेराव घातला आणि या दरम्यान ही चकमक झाली. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121