संजय राऊतांना प्रवीण राऊतकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले : ईडी
अलिबाग, मुंबई येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे वापरले
04-Aug-2022
Total Views |
मुंबई: पत्रा चाळ घोटाळ्याच्या संदर्भात छापे मारताना ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी अलिबागमधील दहा भखंडांसाठी विक्रेत्यांना तीन कोटी रुपये रोख दिले होते. मुंबईतील गोरेगाव परिसरातील चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.
ईडीने बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी 'एचडीआयएल'च्या माजी अकाउंटंटचे जबाब नोंदवले. या प्रकरणी इतर अनेकांनाही समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांच्या खात्यात जमा केलेल्या पैस्यांसोबातच, त्यांना प्रवीण राऊत नावाच्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाली होती. हा पैसा अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत हे पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचे काम सांभाळत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राऊत यांना सोमवारी दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ईडीने त्यांच्या घरी छापा टाकला, त्यांना अनेक तास ताब्यात घेऊन चौकशी केली, आणि अटक केली. तत्पूर्वी, शिवसेना नेते संजय राऊत यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्याबद्दल भाजपवर टीका केली होती आणि दबावाला बळी न पडणारा "खरा शिवसैनिक" म्हणून राज्यसभा खासदाराचे कौतुक केले होते. एका अर्थाने आर्थिक गुन्ह्यात संशयित असलेल्या संजय राऊत यांची पाठराखण उद्धव ठाकरे यांनी केली.