महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया! मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

    30-Aug-2022
Total Views |

nah
 
मुंबई : कोरोनाच्या सावटात गेली दोन वर्षे कुठल्याच सण- उत्सवांचा आनंद घेता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे सर्वच निर्बंध शिथिल करत राज्य सरकारने सर्वच नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. राज्यात सध्या गणेशोत्सवाचे उत्साहाने भरलेले माहोल आहे. मुंबईतही गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
 
"गेल्या दोन वर्षातील कोरोना संकटाचे मळभ दूर झाल्याने यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. या पार्श्वभूमीवर विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया" अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातले हे सरकार जनतेच्या प्रश्नांची उकल करतच आहे आणि यापुढेही करत राहिलच असा विश्वास यातून मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला आहे.