स्वदेशी पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी भारतीय लष्कराकडून पूर्ण
30-Aug-2022
Total Views | 66
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने स्वदेशी विकसित आणि निर्मित 'पिनाका' लॉंग रेंज रॉकेटच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. गेल्या काही आठवड्यांत बालासोर आणि पोखरण येथे नवीन रॉकेटच्या चाचण्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'च्या प्रयत्नांना हे मोठे यश आहे.
सरकारी मालकीच्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आणि नागपूरस्थित इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (ईईएल) यांनी विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी पार पडली. लॉंग रेंज पिनाका रॉकेटची झेप ४५ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने रॉकेट विकसित केले आहेत. या रॉकेट चाचण्या रशियाकडून आयात कमी करण्यास मदत करतील. आणि निर्यातीसाठी भारताला संधी प्राप्त करून देतील.