दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आशिया चषक टि-20 विश्वचषकात पाकिस्थानाकडुन झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे. भारत विरुध्द पाकिस्थान हा सामना रविवारी दि. 28ऑगस्टला दुबईत रंगणार आहे. या सामनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आशिया चषक टि-२० विश्वचषकाची सुरुवात शनिवार दि. 27 ऑगस्टला दुबईत होणार आहे. श्रीलंका विरुध्द आफगाणिस्थान यांच्या मध्ये खेळला जाणार आहे. यंदा श्रीलंका या चषकाचे यजमान आहे, पण देशात सुरु असलेल्या आणिबाणीमुळे युएई मध्ये सामना आयोजित करण्यात आला. हा चषक 6 संघामध्ये खेळला जाणार आहे. 11 सप्टेंबरला आतिंम सामना होणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टि-20 विश्वचषकाचे भविष्य या चषकाच्या माध्यामातुन ठरवला जाईल.
The wait is finally over as the battle for Asian supremacy commences on 27th August with the all-important final on 11th September.
The 15th edition of the Asia Cup will serve as ideal preparation ahead of the ICC T20 World Cup. pic.twitter.com/QfTskWX6RD
भारत, पाकिस्थान आणि क्वालिफायर हा अ गट आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ब गटात आहेत. यूएई, कुवेत, हाँगकाँग आणि सिंगापूर यापैकी एक संघ अ गटात सामील होतील. आशिया चषक टी-20 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त एकदाच सामना झाला आहे. 2016 मध्ये भारताने सामना जिंकला होता. एकूणच, आशिया कप स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर 8-6 अशी आघाडी आहे. अ आणि ब गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 फेरीत प्रवेश करतील आणि भारत 4 सप्टेंबरला पुन्हा पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे. सुपर 4 मधील दोन संघ रविवारी दि. 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळतील.
भारताचे असे असतील सामने
दि. 28 ऑगस्ट: दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान: सांयकाळी 7:30
दि. 31 ऑगस्ट: दुबईमध्ये भारत विरुद्ध क्वालिफायर: सांयकाळी 7:30
भारत विरुद्ध पाकिस्तान सामनात भारत अग्रेसर
टी-20: सामने: 9, भारत विजय: 6, पाकिस्तान: 2, बरोबरी: 1
एकदिवसीय: सामने: 132, भारत विजय: 55, पाकिस्तान: 73, बरोबरी: 4
कसोटीः सामनेः 59, भारत विजयः 9, पाकिस्तानः 12, अनिर्णितः 38
आयसीसी स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान
विश्वचषक: सामने: 7, भारत विजय: 7, पाकिस्तान: 0
टी-20 विश्वचषक: सामने: 6, भारत विजयी: 4, पाकिस्तान 1, बरोबरी: 1
चॅम्पियन्स ट्रॉफी: सामने: 5, भारत विजय: 2, पाकिस्तान: 3