मुंबई : करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमाचा सातवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. ओटीटीवर शो सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद याला मिळाला आहे. नुकताच 'कॉफी विथ करण ७' चा प्रोमो रिलीज झाला आहे. या नव्या एपिसोडमध्ये 'लालसिंग चढ्ढा'च्या प्रमोशनसाठी करीना कपूर आणि आमीर खान हे दोघे आले आहेत. करण जोहरने त्यांच्या या भागाचा प्रोमो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये करण जोहर आणि बेबो मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची टिंगल करत आहेत. यात एका टास्क मध्ये आमिरच्या प्रश्नाची उत्तरे बेबोने दिली आहेत, यामध्ये बेबोने आमिरची एक वाईट सवय सर्वांना सांगितली आहे. त्यात बेबो म्हणतेय, आमिर एक चित्रपट करायला २००-३०० दिवस लावतोस, अक्षय कुमार ३० दिवसांत त्याचे चित्रपट करतो. तर नंतर आमिरच्या फॅशन सेन्सला किती मार्क देशील हा प्रश्न विचारल्यानंतर बेबो 'मायनस' असे म्हणाली.
बेबोच्या या उत्तरांवर आमिर हसत हसत म्हणाला करण जेव्हा कार्यक्रमात बोलावतो तेव्हा कोणाचा न कोणाचा अपमानच होतो. एकंदर या कार्यक्रमाचा धम्माकेदार प्रोमोबघून हा भाग विशेष असेल, असे दिसत आहे.