१५ वर्षांचीअंकिता शाहरुख खानच्या एकतर्फी प्रेमाचा बळी!

    29-Aug-2022
Total Views |

jahar
 
रांची : झारखंडच्या दुमका येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून ठार मारणाऱ्या शाहरुख नावाच्या एका विशिष्ट समाजातील तरूणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हिंदू संघटना आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात उभ्या ठाकल्या आहेत. अंकिता असे त्या अभागी तरुणीचे नाव आहे. २३ ऑगस्टला शाहरुखने संधी साधून अंकितावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या अंकिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे ५ दिवस सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशीच ठरली आणि रविवारी अंकिताचे दुर्दैवी निधन झाले.
 
 
सोमवारी सकाळी अंकिताच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . तिच्या मृत्यूची बातमी पसरताच लोकांचा प्रक्षोभ झाला आणि उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. त्यात विहिंप, भाजप, बजरंग दल यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन आरोपीला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी केली. लोकांचा रेटा इतका जबरदस्त होता की, पोलिसांना लोकांना आवरण्यासाठी शस्त्रबळाचा वापर करावा लागला आणि संपूर्ण गावात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि लवकरात लवकर अंकिताला न्याय मिळवून दिला जाईल अशा अर्थाचे ट्विट केले आहे. शाहरुखलाही अटक करण्यात आली आहे.
 
 
१५ वर्षीय अंकिता १२वीत शिकत होती. जवळपास दोन वर्षांपासून शाहरुख अंकिताला त्रास देत होता. तिचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे असले उद्योग शाहरुख करत असे. त्यामुळे त्रस्त होऊन या त्रासाबद्दल घरच्यांना सांगितले. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने गप्प राहिलेले तिचे घरचे शाहरुखचे हे उद्यो प्रमाणाबाहेर वाढायला लागल्यावर पोलिसांत गेले होते. शाहरुखला सुरुवातीला पोलिसांनी समाज दिली पण काही दिवसानंतर शाहरुखकडून पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात झाली. हल्ला होण्याच्या काही दिवस आधी त्याने कळसच गाठला होता. २३ऑगस्टच्या सकाळी ५ च्या सुमारास शाहरुखने संधी साधून अंकितावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
 
 
गंभीर जखमी झालेल्या अंकितची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशीच ठरली. मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबात तिने सर्व घटनाक्रम कथित केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंकिताच्या मृत्यूमुळे लोकांचा क्षोभ एवढा होता की पोलीस बंदोबस्तात तिचे अंत्यसंस्कार पार पडले.