संभाजी ब्रिगेड - शिवसेना युती; सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला साथ!
26-Aug-2022
Total Views |
मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देणारी युती झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 ऑगस्ट रोजी, युती केली आहे. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबबातची सविस्तर माहिती दिली. संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला साथ...
संभाजी ब्रिगेडने मैत्रीचा हात पुढे केला, आम्ही तो स्विकारला, आम्ही दिलदारपणे मैत्री निभावणारे आहोत. आमची मैत्री निभावण्याची रीत बघून भविष्यात अनेक पक्ष संघटना आमच्यासोबत येतील. असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.